26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeमहाराष्ट्रमी मतदानासाठी येणारच : लक्ष्मण जगताप

मी मतदानासाठी येणारच : लक्ष्मण जगताप

एकमत ऑनलाईन

पुणे : विधानपरिषद निवडणुका काही तासांवर येऊन ठेपल्या असताना सर्व पक्षांकडून एका एका मतासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुप्त मतदान असल्यामुळे आमदारांची फोडाफोडी होण्याची भिती आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले असून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान भाजपचे चिचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हेसुद्धा विधानपरिषद निवडणुकांच्या मतदानासाठी जाणार असून ‘मी मतदानासाठी येणारच’ असे विधान केले आहे.

सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकात एका एका मतासाठी पळापळ सुरू असताना लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी हजर असणार आहेत. राज्यसभेच्या मतदानासाठी ते व्हील चेअर वरून हजर राहिले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या विजयानंतर हा विजय आमचा नसून आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर प्रकृतीमुळे विधानपरिषदेसाठी त्यांच्या मतावर प्रश्नचिन्ह होते.

देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही तुमची प्रकृती संभाळा, मत महत्त्वाचं नाही प्रकृती महत्त्वाची आहे. असं म्हटलं होतं पण लक्ष्मण जगतापांनी ‘मी मतदानासाठी येणारच ’असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ते उद्या मुंबईत मतदानासाठी हजर राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान राज्यसभा निवडणुकांसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या आमदार मुक्ता टिळक यासुद्धा आजारी असताना अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे राज्यसभेच्या निवडणुकासाठी मतदान करायला हजर राहिल्या होत्या. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघेही मोठ्या आजाराने ग्रस्त आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या