32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रआयसीएसई दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

आयसीएसई दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता आयसीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसंच या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आयसीएसई सोबतच सीआयएससीई बोर्डानेही दहावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. या परीक्षा १० मे २०२१ पासून सुरू होतील. आयसीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पेन-पेपर पद्धतीत ऑफलाईन होणार आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह देशात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा स्थितीतही विविध बोर्डाकडून दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच, या परीक्षा ऑफलाईनच होतील, असेही सांगण्यात आले आहे.परीक्षेची तारीख घोषित झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात काहीशी चिंता निर्माण झाली आहे. कारण कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ऑफलाईन परीक्षेबाबत मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाकडूनही नुकतेच १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वी या वेळापत्रकावर पालक, शिक्षण व विद्यार्थ्यांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. अखेर चर्चेनंतर नवीन वेळापत्रक ठरविण्यात आलं आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाकडून देण्यात आली.

नव्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र बोर्डाची १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान ठेवण्यात येणार आहे, तर दुसरीकडे १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होईल, असे सांगण्यात आले आहे. या परीक्षांदरम्यान कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

 

कंगनाला जामीनपात्र वॉरंट जारी; जावेद अख्तर प्रकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या