21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रपुन्हा बोलावले, तर मी येणार नाही!

पुन्हा बोलावले, तर मी येणार नाही!

एकमत ऑनलाईन

पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिले वर्ल्ड रेकॉर्ड केले तेव्हा मला बोलावले, मी आलो त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता दुसरे रेकॉर्ड करत आहे, त्यावेळी मला बोलावले, त्यावेळी मी उपमुख्यमंत्री आहे. आता तिसरे रेकॉर्ड केले आणि मला बोलविल्यास मी येणार नाही असे मिस्किलपणे बोलत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने स्वांतर्त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमातंर्गत युवा संकल्प अभियानांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही, तर शिक्षणाबरोबरच ज्ञानाधारित समाजनिर्मितीमध्ये विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षणातून ज्ञानाकडे वाटचाल होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारत हा विश्व गुरू होईल, त्याची वाटचाल आता सुरु झाली आहे.

यापूर्वी हिरक महोत्सव, रौप्य महोत्सव हे केवळ सरकारी कार्यक्रम असायचे. बृहत समाजाचा त्यांच्याशी संबंध नव्हता. परंतु आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हा सर्वाचा आहे. राष्ट्रभक्ती ही केवळ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी यापूर्ती मर्यादित न ठेवता ती भावना सतत मनात तेवत ठेवायला हवी. राष्ट्र घडविण्यासाठी समग्र व्यक्तीमत्त्व घडले पाहिजे, अशी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी विद्यापीठांनी महत्त्वाची भूमिका बजाावली पाहिजे, असेही फडणवीस यांनी अधोरेखित केले. ‘पुढच्या वेळी जरी कोणता रेकॉर्ड केला आणि मला बोलवा, मी कोणत्याही पदावर असलो तरी मी येईल’, असे म्हणत फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या