21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रगरीबांवर अन्याय होत असेल तर कायदा हातात घेणार : आ. संतोष बांगर

गरीबांवर अन्याय होत असेल तर कायदा हातात घेणार : आ. संतोष बांगर

एकमत ऑनलाईन

मुंबई : मला हे काही नवीन नाही. गोरगरीबांवर अन्याय होत असेल, तर मी कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. टीकेची मला पर्वा नाही. फक्त हिंगोलीतच नाही, तर महाराष्ट्रभरात हीच परिस्थिती आहे. हिंगोलीत ४८ हजार डबे दाखवले आहेत. हिंगोलीची लोकसंख्या ७५ हजार आहे. पण त्यांनी कामगारच ४७ हजार दाखवले आहेत. मी विधानसभेत हे प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटूनही याबद्दल सांगणार आहे, असे संतोष बांगर व्यवस्थपकाच्या प्रकरणात खुलासा केला आहे.

मध्यान्न भोजन योजनेद्वारे कामगारांना निकृष्ट जेवण देणा-या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावल्याचा बांगर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर बांगर यांनी त्यावर खुलासा केला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राजकीय भूकंपामध्ये संतोष बांगर हे नाव देखील जोरदार चर्चेत होतं. आधी बंडखोरांवर तोंडसुख घेणारे बांगर नंतर बंडखोर गटाला जाऊन मिळाल्यामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका देखील करण्यात येत होती. मात्र, आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये संतोष बांगर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले आहेत. त्यामुळे बंडखोर गटाला मिळाल्याची टीका काहीशी ओसरली असली, तरी आता त्यांच्यावर एका नव्या वादामध्ये टीका होऊ लागली आहे.

नेमके काय झाले?
हिंगोलीत एका मध्यान्न भोजन केंद्राला संतोष बांगर यांनी १५ ऑगस्ट रोजी भेट दिली. या केंद्रात कामगारांना सरकारी योजनेतून पुरवल्या जाणा-या जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून संतोष बांगर यांना संताप अनावर झाला. रागाच्या भरात बांगर यांनी या केंद्राचं काम पाहाणा-या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. बांगर यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर सत्ताधारी पक्षात असूनही कायदा हातात घेतल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. यासंदर्भात आता खुद्द बांगर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

मला टीकेची पर्वा नाही : बांगर
कितीही टीका झाली, तरी आपल्याला त्याची पर्वा नसल्याचं संतोष बांगर म्हणाले आहेत. ‘‘माझ्यावर टीका झाली तरी मला त्याची पर्वा नाही. गोरगरीब कामगार सकाळपासून कष्ट करतात. त्यांना जर पोटभर चांगलं जेवण मिळत नसेल, तर असा कायदा हाती घेणं माझ्यासाठी नवीन नाही. अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं काम मी शिवसेनेकडून करत असतो. ज्या गरीबांनी मला निवडून दिलं, त्यांच्यासाठी जर लढा द्यायचा नाही, तर कुणासाठी द्यायचा? यांना वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसेल, तर याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता’’, असं बांगर म्हणाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या