23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeमहाराष्ट्रगरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी एकदिवसीय अधिवेशन बोलावणार

गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी एकदिवसीय अधिवेशन बोलावणार

एकमत ऑनलाईन

पुणे : मराठा समाजाला शिक्षण आणि नोक-यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्दबातल ठरवला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक आहे. गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन बोलावू. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशाच प्रकारची महाविकास आघाडीची भूमिका आहे, असे त्यांनी बोलून दाखवले.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे काहीही चुकले नाही. ज्यावेळी कायदा ज्यावेळी झाला त्या अगोदर महाराष्ट्राच्या विधीमंडळात एकमताने ठराव झालेला होता. सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला होता. उच्च न्यायालयातदेखील ते मान्य केले गेले. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले, काहीजण तिथे गेले. तिथे तारखा पडल्या. त्यावेळी फडणवीसांचे सरकार असताना जे वकील होते, ती जशीच्या तशी टीम ठेवण्यात आली. उलट काही अतिरिक्त वकीलही तिथे देण्यात आले.

आपण जर नीट निकाल वाचला, तर त्या निकालात त्यांनी मागील काळात तामिळनाडूने आरक्षण ५० टक्क्यांच्या वर दिले किंवा इतर राज्यांनी दिले, त्याला कुठेही धक्का लावलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, असे त्यांनी सांगितले. पण त्यांनी लोकसभा किंवा राष्ट्रपती याबाबतचा निर्णय घेऊ शकतात. त्याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशाच प्रकारची महाविकास आघाडीची भूमिका आहे, असे सांगितलेले आहे.

मात्र, आता काहीजण वेगळे राजकारण करून चुकीच्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत. वास्तविक याला काहीही अर्थ नाही. यामध्ये सगळ््यांनीच सर्वतोपरी लक्ष घातले आणि फक्त सरकारच नाही अन्य संघटनांनादेखील त्यांची बाजू मांडण्याचा तिथे वकील देण्याचा अधिकार होता. त्यामुळे सगळ््यांनी प्रयत्न केला, असेही पवार म्हणाले.

सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेऊ
भारत सरकारने ३७० कलम रद्द केले. तशाप्रकारे संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल आम्ही राज्यातून एकमताने शिफारस करू. वेळ पडली तर कोरोनाच्या संकटानंतर विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष या सर्वांना विश्वासात घेऊन पंतप्रधानांकडेदेखील शिष्टमंडळ नेण्याची तयारी महाविकास आघाडीने ठेवली आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवले.

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० कोटीचे हेरॉईन जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या