22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeमहाराष्ट्रआघाडीचं सरकार आलं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते - नारायण...

आघाडीचं सरकार आलं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते – नारायण राणे यांचा दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले नसते तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आज भाजपमध्ये असते, असा दावा माजी मुख्यमंत्री व भाजपा खासदार नारायण राणे यांनी आज केला. जयंत पाटील यांनी मात्र हा दावा फेटाळून लावताना भाजपा प्रवेशाबाबत कोणाशी चर्चा झाली होती त्या नेत्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान राणे यांना दिले आहे.

रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले नसते तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आज भाजपमध्ये असते, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. आज जर भाजपचं सरकार असतं तर जयंत पाटील त्या सरकारमध्ये मंत्री असते. तशी तयारी त्यांनी दर्शवली होती. भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या नेत्यांशी त्यांची सगळी बोलणी झाली होती. काही गोष्टींकरता ते थांबले होते. नाहीतर ते आज भाजपमध्ये असते, असा दावा राणे यांनी केला.

कोणत्या नेत्यासोबत माझी चर्चा झाली ते जाहीर करा ! -जयंत पाटील
भाजपच्या कोणत्याही नेत्यांसोबत भाजपमध्ये जाण्यासाठी माझी चर्चा झालेली नाही. शरद पवार साहेबांचा मी कार्यकर्ता असल्याने असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही असे स्पष्टीकरण करताना, भाजपच्या कोणत्या नेत्यासोबत माझी बोलणी झाली हे नारायण राणे यांनी जाहीर करावेच असे आव्हान जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. नारायण राणे यांचा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांत समावेश नाही हे समजून खेद वाटला असा टोलाही पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील यांची पक्षप्रवेशाबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलणी झाली होती.आज महाविकास आघाडी सरकार नसते तर जयंत पाटील भाजप सरकार मध्ये मंत्री असते असे भाजप खासदार नारायण राणे म्हणाले आहेत.त्यावर ट्विट करून जयंत पाटील यांनी खुलासा केला.पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही.त्यामुळेच मागील पाच वर्षे मी सरकार विरोधात विधिमंडळात लढत होतो.दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे असे जयंत पाटील म्हणाले.

उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या