23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रजनतेने निवडून दिले असेल तर घराणेशाही कशी?

जनतेने निवडून दिले असेल तर घराणेशाही कशी?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बहुमतांनी अस्तित्वात आणलेले हे सरकार आहे. जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी? लोकशाहीत घराणेशाही आणू नये, भ्रष्टाचारांचं समर्थन कुणीही करू नये. पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उत्तर दिलंय. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई-राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी अजित पवार म्हणाले, सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. खुप काही साध्य करणायचा प्रयत्न केला आहे. अजून काही मिळवायचं आहे. जातींमध्ये सलोखा ठेवायचा आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे मी फार खोलात जात नाही असे अजित पवार यावेळी म्हणाले.

घराणेशाही, राजकारणाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदींनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गुणवत्तेवर अन्याय होत असल्याने घराणेशाहीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, मी ज्यावेळी काका-पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतोय असं वाटतं. दुर्देवाने राजकारणातील या घराणेशाहीची लागण देशातील इतर संस्थांमध्ये झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले आहे.

लोकशाहीत घराणेशाही कुणीही आणु शकत नाही
अजित पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी? लोकशाहीत घराणेशाही कुणीही आणु शकत नाही. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा आठवण करुन दिली. जर कुणाच काम चांगल असेल तर आजपर्यंत आपण पाहिलं लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकिर्द पाहिली. त्यानंतर इंदिरा गांधी यांची कारकिर्द पाहिली, एक पोलादी स्त्री म्हणून त्या लोकप्रिय आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये आपण राजीव गांधी याचीही कारकिर्द पाहिली.कॉम्प्युटरच युग हे खऱ्या अर्थांनी त्यांनी आणलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या