26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रव्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घ्या

व्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घ्या

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : केंद्र सरकारतर्फे पाठवण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी ९० टक्के व्हेंटिलेटर सुरू आहेत. केवळ पाच ते दहा टक्के व्हेंटिलेटरमध्यच समस्या आहेत. काही ठिकाणी व्हेंटिलेटर पाठवल्यानंतर ते तीन ते चार महिने पडून होते,याचाही विचार केला पाहिजे. मात्र असे असले तरी काही मशीन बरोबर नसतील, तर ते बदलून घेतले पाहिजेत व संबंधितांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सोमवारी (दि.१७) विभागीय आयुक्तालयात फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात केंद्र सरकारतर्फे लाखो व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले आहे. राज्यालाही पाच हजार व्हेंटिलेटर केंद्राने दिले आहेत. यातील ९० टक्के मशीन हे देश व राज्यातील वेगवेगळया कानाकोप-यातील भागात दिले असून ते व्यवस्थित काम करीत आहेत. काहींमध्ये समस्या आल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्योती कंपनीच्या मशीनमध्येच अडचणी आल्या. हे मशीन चार-चार महिने धूळ खात पडून होते. त्यांचे नीट स्टोरेज केले गेले नाही. ते पडून राहिल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात आमचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी केंद्र सरकारकडे हा विषय पोहोचविला आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

राजकारण न करण्याचे आवाहन
कोणी चुकीचे करत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हायला पाहिजे. मात्र यासंदर्भात राजकारण करू नये, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. जे व्हेंटीलेटर खराब आहेत, ते बदलून घेतले पाहिजेत. पण सर्व व्हेंटिलेटर खराब आहेत. त्यात काहीतरी गडबड आहेत, असे आरोप करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

पैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या