21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना नसती तर मराठी माणूस संपला असता : ठाकरे

शिवसेना नसती तर मराठी माणूस संपला असता : ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : व्यगंचित्रकार काय असतो, व्यगंचित्रकार काय करू शकतो, याचे जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मुंबईत, महाराष्ट्रात मराठी माणसाचे आणि देशात हिंदूंचे काय झाले असते, हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मार्मिकच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते असे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, काहींना असे वाटते शिवसेना ही उघड्यावर पडलेली एक वस्तू आहे. जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकते. तसे नाही आहे. शिवसेनेची पायमुळे ६२ वर्ष तर सरळ दिसत आहेच, पण त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या आजोबानी या विचारांची पेरणी केली आहे.

विचाराने माणूस थकता कामा नये
मार्मिक बद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजोबा बाळासाहेब म्हणायचे विचाराने माणूस थकता कामा नये. ते म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपली होती. बाळासाहेबांनी विचार केला आणि व्यंगचित्र साप्ताहिक काढले. मुंबई मिळवली तरी मराठी माणसावर अन्याय होताच त्याची वाचा फोडण्याचे काम मार्मिकने केले. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना आणि व्यंगचित्र काढली. आता व्यंगचित्रकार किती हा वादाचा विषय पण व्यंगचित्रकार असायलाच हवा. महाराजांच्या काळात जे शाहीर काम करायचे ते व्यंगचित्रकाराच्या रेषेत सामर्थ्य.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या