24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रनिर्बंध नको असतील तर, शिस्त पाळा

निर्बंध नको असतील तर, शिस्त पाळा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर, स्वतःहून शिस्त पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.

वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आज कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जर का नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीमध्ये डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोरोना संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोरोना आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. तसेच कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या