24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नाही; कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्माने...

मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नाही; कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्माने मौन सोडले

एकमत ऑनलाईन

मुंबई : रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला. त्यानंतर आता रेणू शर्माने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे रेणू शर्माने म्हटले आहे़

धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून, समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे रेणू शर्माने म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे़ मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असे रेणू शर्माने स्पष्ट केले आहे

लातूर शहरासाठी ‘कोविशिल्ड’च्या सात हजार कुप्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या