26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा - अमित देशमुख...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

एकमत ऑनलाईन

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण असणे काळाची गरज बनली आहे. आज मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार काम करीत असताना या क्षेत्रामुळे अनेक रोजगार निर्माण होत आहे हे विचारात घेऊनच या क्षेत्रासाठी निश्चित धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मनोरंजन क्षेत्रातून मोठी भर पडत असून यामध्ये आणखी वाढ होण्यास वाव आहे. यासाठीच येणाऱ्या काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबई बरोबरच राज्यातील इतर चित्रिकरण स्थळांकडे आर्कर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महामंडळामार्फत 3 दिवस आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये चर्चिले गेलेल्या बाबींचाही मनोरंजन क्षेत्रासाठीचे सर्वंकष धोरण ठरविताना समावेश करण्यात यावा, असे निर्देश अमित देशमुख यांनी यावेळी

महामंडळाने गेल्या १५ वर्षाची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे. यापुढील काळाहतही ही परंपरा अशीच सुरु राहील. येणाऱ्या काळात महामंडळ केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवरही महत्वाची कामगिरी करेल असा विश्वास यावेळी अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या