22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारचा फॉर्म्युला सर्वत्र राबवा; संजय राऊत यांचा युपीएला सल्ला

महाराष्ट्र सरकारचा फॉर्म्युला सर्वत्र राबवा; संजय राऊत यांचा युपीएला सल्ला

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे आदर्श सरकार असल्याचे मत व्यक्त केले आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसप्रणित युपीएने देखील महाराष्ट्रातील सत्तेचा हाच फॉर्म्युला केंद्र पातळीवर राबवायला हवा, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे. महाराष्ट्राने देशातल्या भाजपविरोधी पक्षांना एक नवा मार्ग दाखवला आहे. विचारसरणी वेगळी असून देखील तीन वेगवेगळया पक्षांनी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात आदर्श सरकार चालवले आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.युपीएने देखील हा प्रयोग देश पातळीवर राबवायला हवा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देशातल्या २७ विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख केला आहे, अशी पुस्ती देखील राऊतांनी जोडली आहे.

सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची हाक
सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करून एका नव्या राजकीय व्यवस्थेविषयी विचारविनिमय करायला हवा. १९७५मध्ये जय प्रकाश नारायण यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले होतं. पण दुर्दैवाने आज देशात तसे नेतृत्व नाही, असे प्रतिपादनही राऊत यांनी केले आहे.

काँग्रेसच्या प्रतिक्रियेकडे असणार लक्ष
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करण्यासंदर्भात राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला होता. काँग्रेसच्या राज्यातल्या नेतेमंडळींनी संजय राऊतांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. तसेच, युपीएमध्ये नसलेल्या पक्षाच्या नेत्याने युपीएचे नेतृत्व कुणी करावे हे सांगू नये, असेही सुनावले होते. त्यामुळे आता राऊतांच्या पुन्हा व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनावर प्रामुख्याने काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘डेमीगॉड’ रजनीकांत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या