20.7 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रघाटकोपरमध्ये गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार

घाटकोपरमध्ये गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये एका गतिमंद मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी पब्लिक टॉयलेटमध्ये जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला ओढत नेले.

दरम्यान मुंबई येथील घाटकोपरमध्ये एकाने पीडितेवर बलात्कार केला, तर, इतर दोघांनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे जबाब नमुद करण्यात आले आहे.

आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबतचे काही व्हिडिओ पीडितेच्या भावाने सोशल मीडियावर पाहिले. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादवि कलम पोस्को तसेच आयपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. तसेच आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या