26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात नाना पेठेतील वाड्याची भिंत कोसळली ; दोघेजण जखमी

पुण्यात नाना पेठेतील वाड्याची भिंत कोसळली ; दोघेजण जखमी

एकमत ऑनलाईन

पुणे : सोमवारी दिवसभर शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील एका वाड्याची भिंत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ पोचून भिंतीमध्ये अडकलेल्या जखमी व्यक्तीसह चार जणांना सुखरूप बाहेर काढले.

शहरात रविवारी रात्रभर आणि दुस-या दिवशी सोमवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस होता. तर रात्री आठ वाजल्यापासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान, शहरात पावसामुळे झाडे पडण्याच्या १६ घटना दिवसभरात घडल्या. त्यानंतर नाना पेठ येथील मॉडर्न बेकरीसमोरील एका दुमजली वाड्याची भिंत कोसळली.

त्यामुळे या वाड्यात राहणारे दोघेजण भिंतीमध्ये अडकले. याबाबत अग्निशामक दलास माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच जवान घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. लाकूड, पत्रे, दगड, माती व चिखल बाजूला काढून अग्निशामक दलाच्या जवानांनी कमलाकर झिंजुर्के (वय ६४), राजेंद्र झिंजुर्के (वय ६०), भारती झिंजुर्के (वय ५०) अशा तिघांना तेथून बाहेर काढले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या