27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशहापुरात गुणकारी रानभाज्या बाजारात

शहापुरात गुणकारी रानभाज्या बाजारात

एकमत ऑनलाईन

खर्डी : पहिला पाऊस पडल्यानंतर रानमाळावर कुठलेही बी-बियाणे, खत न टाकता जंगलात औषधी रानभाज्या उगवत असतात. या भाज्या अनेक विकारांवर उपयोगी असल्याने तालुक्यातील खर्डी, वांसिद , कसारा व छोट्या-छोट्या बाजारात खरेदीसाठी महिलांची झुंबड उडत आहे. या गुणकारी भाज्या कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरातही विक्रीसाठी जात असल्याने आदिवासी बांधवांना सुगीचे दिवस येत आहेत.

शहापूर तालुक्यातील खर्डी,वांसिद , माहुली, दहिगाव, अघई, जरंडी, भोसपाडा, अजनुप, बेलवड येथील माळरानावर सध्­या पहिल्या पावसामुळे निसर्गनिर्मित माठ, तेळपट, तोरणा, आनंदवेल, रानटोण, करडई, सफेद मुसळी, खुरासणी, पापली, टाकळा, मायाळू, ंिदडा, लोत, नारणवेल यांसारख्या अनेक औषधी वनस्पती आल्याने आदिवासी महिला त्या वनस्पती विक्रीसाठी तालुक्यातील बाजारात आणत आहेत.

रानभाज्यांच्या आधारावर आदिवासी कुटुंब पावसाळ्यात आपल्या संसाराचा गाडा चालवतात. बाजारातील इतर भाज्यांपेक्षा या भाज्या स्वस्तात मिळत असल्याने गृहिणींची त्यावर झुंबड उडत आहे. या भाज्यांमध्ये शेवळी ही भाजी वातविकारावर उपयुक्त असून ही भाजी उकडून, सुकवून ठेवून वर्षभर खाण्यासाठी वापरतात. बाफळी या भाजीचा उपयोग बधकोष्ठता व पोटदुखीवर गुणकारी आहे. कंटोळ ही भाजी संधिवात व पित्ताच्या विकारावर उपयोगी पडते.

कोळी या भाजीला सर्वात जास्त मान असून, शेतकरी पेरणी करण्याअगोदर या भाजीचा नैवेद्य कुलदैवताला दाखवतात. या चविष्­ट व गुणकारी भाज्या घेण्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे येथून व्यापारी भाज्या खरेदीसाठी येत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या