23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रशेवटी निकाल सरकारला पाहिजे तसाच लागतो

शेवटी निकाल सरकारला पाहिजे तसाच लागतो

एकमत ऑनलाईन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात ब-याचदा असे वाटते आता निकाल जनतेच्या बाजूने लागेल. सरकारवर ताशेरे मारले जातात. आणि नंतर निकाल सरकारला पाहिजे तसाच लागतो, असे शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे निवृत्त होत असल्यानं ही सुनावणी ५ आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय दिला आहे. यावर ते बोलत होते.

सरकारने गुंठ्याला अवघे १३६ रुपये दिलेत, अजूनही पंचनामे सुरू नाहीत. राज्य सरकारने शेतक-यांना केलेली मदत तोकडी आहे. आता सत्ता स्थापन झाली असून त्यांनी शेतक-यांच्या समस्या सोडवायला हव्यात. शेतक-यांना बेदखल करू नका अन्यथा शेतकरी सरकारला बेदखल केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.

हे न्यायालयासाठी धोकादायक
ओबीसी आरक्षणावर ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे-फडणवीस सरकारसाठी धक्का आहे. कारण, किमान ५ आठवडे प्रभागरचना करता येणार नाही. राज्य सरकारला ४ प्रभागाचा एक प्रभाग करायचा होता. निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. हा सगळा खेळखंडोबा सुरू आहे. तसेच न्यायालयाबद्दल बोलत असताना खरे तर १० वेळा विचार करायला हवा. सरकारला हवा असलेला निर्णय न्यायालय घेते, असे आता खुलेआम लोक बोलत आहेत. हे न्यायालयासाठी धोकादायक आहे.

स्वतंत्र लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार
खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी तयारी सुरू केली आहे. कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्र लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी पांिठबा दिला तर घेणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, . मला कोणी पांिठबा द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या