मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांचा तर महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे सचिन अहिर यांचा विजय झाला आहे.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण 8 उमेदवारांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.
विधानपरिषदेतील विजयी उमेदवार
रामराजे निंबाळकर
एकनाथ खडसे
आमशा पाडवी
सचिन अहिर
प्रवीण दरेकर
राम शिंदे
श्रीकांत भारतीय
उमा खापरे