25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रलोकलमध्ये महिलांची दे दणादण, एकमेकींच्या उपटल्या झिंज्या

लोकलमध्ये महिलांची दे दणादण, एकमेकींच्या उपटल्या झिंज्या

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : लोकल ट्रेनमध्ये आसनावर बसण्याच्या कारणावरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल लोकलमध्ये हा प्रकार घडला. ही हाणामारी इतकी तुंबळ झाली की महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या. संतापजनक बाब म्हणजे ही मारामारी सोडविण्यासाठी मधे पडलेल्या महिला पोलिसांनादेखील महिलांनी मारहाण केली.

हा प्रकार ट्रेनच्या डब्यातील इतर महिलांनी कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे दिवसभर मुंबईत हा विषय चर्चेचा होता. ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलच्या दिशेने जात होत्या. गाडी कोपरखैरणे स्थानकात येताच एक महिला ट्रेनमध्ये चढली. तुर्भे स्थानकात जागा झाल्यामुळे ती बसली, मात्र तिने छोटया मुलीला बसू दिले नाही. यावरून तिघा महिलांमध्ये आधी वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा प्रकार पाहून महिला पोलिसांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही या महिलांनी जुमानले नाही. गाडी नेरुळ स्थानकात येईपर्यंत हे भांडण सुरु होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या