25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात ६३,७२९ आज नवीन रुग्ण तर ३९८ रुग्णांचा मृ्त्यू

राज्यात ६३,७२९ आज नवीन रुग्ण तर ३९८ रुग्णांचा मृ्त्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाचा कहर खूप वाढत असताना आज महाराष्ट्रात ६३,७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर राज्यात आज ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोग शाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४(१५.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा धोका देशभरात वाढत आहे. संचारबंदी करूनही नागरिक नियम मोडताना दिसत आहेत.

सध्या राज्यात ३५,१४,१८१व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज ४५,३३५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंतएकूण ३०,०४,३९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ एवढे झाले आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. या संदर्भात आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

६ लाख २० हजारच्या वर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार आहे. पुरवठा सुरळीत होण्याकरता आणखी 2-3 दिवस लागणार असल्याची माहिती राजेंद्र शिंगणेंनी दिली आहे. आता या कंपन्यांच्या सीईओ आणि एमडी यांच्याबरोबर बैठक झाली आहे. ३७ ते ३८ हजार दिवसाला पुरवठा होतो, तो वाढवला जाणार आहे. १९ एप्रिल -२० एप्रिल नंतर पुरवठा सुरळीत होईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.

अबब.. बिअर शॉपी मधून देशी व विदेशी दारु विक्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या