मुंबई : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल ४००४ रुग्ण आढळून आले, तर यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत.
त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के इतका झाला, तर राज्यात आतापर्यंत ७७,६४,११७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८४ टक्के झाले आहे.