24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात कोरोना बाधित रूग्णांत वाढ

पुण्यात कोरोना बाधित रूग्णांत वाढ

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराच्या आणखी एका रुग्णाचे निदान झाले आहे. ३१ वर्षाच्या महिलेला या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, नव्या विषाणूची रुग्णसंख्या आठपर्यंत पोहोचली आहे.
पुणे शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या दोन प्रकारच्या विषाणूंचे रुग्ण आढळले होते.

पुण्यातील आयसर प्रयोगशाळेत या रुग्णांच्या चाचण्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले होते. त्या तपासणीमधून २८ मे रोजी पुण्यात नव्या विषाणू प्रकाराचा शिरकाव झाल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी नव्या विषाणूंचा सात जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते.

मंगळवारी पुन्हा आणखी एक रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांच्या केलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण अहवालात पुणे शहरातील एका ३१ वर्षीय महिलेला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. ही महिला पूर्णपणे लक्षणेविरहित होती; तसेच ती घरगुती विलगीकरणात बरी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या