26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रखासदार गवळी यांच्या अडचणींत वाढ

खासदार गवळी यांच्या अडचणींत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात २७ सप्टेंबरला ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावले होते. त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले आहे. येत्या २० तारखेला अर्थात बुधवारी भावना गवळी यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे.

याआधी भावना गवळींच्या निकटवर्तींयांना देखील ईडीकडून समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. ३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भावना गवळी वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार असून त्यांना याआधी २७ सप्टेंबरला समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या