24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रनागपुरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ

नागपुरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ

एकमत ऑनलाईन

नागपूर : नागपुरात स्वाईन फ्लूची साथ वाढली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लूबाबत झालेल्या लेखापरीक्षणाच्या बैठकीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली असून आतापर्यंत मृतांची संख्या २० वर पोहोचली असल्याचे सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसांत स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागावरचाही ताण प्रचंड वाढला आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर शहरासह परिसरात आरोग्याची समस्या तीव्र बनली आहे. आरोग्याची समस्या चालू असतानाच पावसाचे प्रमाणही वाढले होते, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाबरोबरच स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढल्याने अनेक नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

स्वाईन फ्लूबाबत झालेल्या लेखापरीक्षणाच्या बैठकीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली असून आतापर्यंत मृतांची संख्या २० वर पोहोचली असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वाईन फ्लूची रुग्णसंख्याही वाढली असून रुग्णांची संख्या ३३७ वर पोहोचली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या