मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी, बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना पुन्हा एकदा लसीकरणासाठी आवाहन करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जिनोम सिक्वेंन्सिंग रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, ज्या रुग्णांनी लसीकरण केले नाही त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कोविडच्या मृत्यूपेक्षा अधिक आहे.
ज्या दिवशी २६९ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंन्सिंगसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी १०७ किंवा ३९.७ टक्के लसीकरण झाले नव्हते. पाच जणांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागले आणि त्यातील तिघांना जीव गमवावा लागला. दुसरीकडे, लसीचा एकच डोस घेतलेल्या आठ रुग्णांचा आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या १५४ रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला नाही.
एवढेच नाही तर एकच डोस आणि पूर्ण लसीकरण झालेल्या रुग्णांसाठी आयसीयूमध्ये उपचारांची कमी गरज होती. लसीचे दोन्ही डोस मिळालेल्या फक्त एका रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.