23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रखा. गजानन किर्तीकर शिंदे गटाच्या वाटेवर?

खा. गजानन किर्तीकर शिंदे गटाच्या वाटेवर?

एकमत ऑनलाईन

माजी नगरसेवक अमेय घोलेही जाणार?
मुंबई : शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक अमेय घोले शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली, तर अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत केल्याने ही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, घोले यांनी याचा इन्कार केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी सोमवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राजकीय चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर किर्तीकर हेदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. किर्तीकर शिंदे गटात गेल्यास शिवसेनेला दुहेरी धक्का बसू शकतो.

गजानन किर्तीकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते. त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. तसेच किर्तीकर जुन्या पिढीतील शिवसैनिक आहेत. तेदेखील शिंदे यांच्यासोबत गेल्यास जुन्या शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ शकते. किर्तीकर हे पक्षाच्या नेतेपदी असल्याने शिवसेना कार्यकारिणीत फूट पडली असल्याचे समोर येईल. त्याचा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो.

घोले शेवाळेंच्या संपर्कात?
अमेय घोले हे मुंबईतील वडाळा भागातील नगरसेवक आहेत. अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. युवा सेनेच्या कोअर टीममध्येदेखील घोले यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ते शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या