सातारा : शरद पवारांच्याघरावरील हल्ला प्रकरणी आरोपी असलेले आणि छत्रपती घराण्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सदावर्ते यांची पोलीस कोठडी सोमवारी संपली आहे.
त्यांना सोमवारी कोठडीतून कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी जेलमधून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर व्हिक्ट्रीचं साईन दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी ‘भारत जितेगा, जुर्म हारेगा’, जुलुम कधी टिकत नसतो, जुलुम पराभूत होत असतो, असे म्हणत व्हिक्ट्रीचे साईन दाखवले.
मुंबई, साता-या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही सदावर्तेंवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.