26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रशिक्षक नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोलीच्या दरीत फेकला

शिक्षक नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोलीच्या दरीत फेकला

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : प्रियकराच्या मदतीने पत्नीने शिक्षक पतीचा खून करून आंबोली घाटात फेकून दिल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात घडली होती. या घटनेतील आरोपी पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथेला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायायाने जन्मठेप आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विजयकुमार गुरव असे दुर्दैवी पतीचे नाव असून पोलिस अन्य एका खुनाचा तपास करत असताना विजयकुमार गुरव यांच्या खूनाला वाचा फुटली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावामध्ये नोव्हेंबर २०१७ मध्ये अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने शिक्षक पती विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मीने राहत्या घरी प्रियकर सुरेशच्या मदतीने निर्घृण खून केला होता. खून केल्यानंतर प्रियकराला सोबत घेऊन कारने सावंतवाडी तालुक्यात आंबोली दरीत मृतदेह फेकून पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर जयलक्ष्मी सुरेश चोथेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पहिल्यांदा पोलिस नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदार तपासले. न्यायालयाने पत्नी जयलक्ष्मीसह तिचा प्रियकर सुरेश चोथेला विजयकुमार गुरव यांच्या खूनप्रकरणी दोषी ठरवले होते. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने या प्रकरणात काल शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. अजित भणगे यांनी काम पाहिले.

असा झाला खूनाचा उलघडा
पोलिस अन्य एका खुनाचा तपास करत विजयकुमार गुरव यांच्या खूनाचा उलघडा झाला होता. सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये ५ नोव्हेंबर २०१६ मध्ये अनिकेत कोथळेचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपींनी अनिकेतचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील कावळेसाद पाँईंट परिसरात फेकल्याची कबूली आरोपींनी दिली होती. अनिकेतच्या मृतदेहाचा शोध घेत असतानाच बेपत्ता शिक्षक असलेल्या विजयकुमार गुरव यांचा मृतदेस सापडला. त्यांची बेपत्ता शिक्षण म्हणून नोंद झाली होती. तथापि, विजयकुमार गुरव यांच्या मुलाने मृतदेह ओळखल्याने त्यांची पत्नी आणि प्रियकराने केलेल्या खुनाला वाचा फुटली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या