27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home महाराष्ट्र कांदा निर्यातीबाबत भारताची प्रतिमा बिघडेल

कांदा निर्यातीबाबत भारताची प्रतिमा बिघडेल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : निर्यात होणा-या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. त्यादृष्टीने कांदा निर्यातही केली जाते. मात्र, केंद्र सरकारने काल निर्यातबंदीचा आकस्मिक निर्णय घेऊन शेतक-यांना धक्का दिला आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून जी भारताची प्रतिमा निर्माण झाली आहे, तीदेखील धुळीस मिळू शकते, अशी भीती माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. त्यांनी आज केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले. दरम्यान, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक बेल्टमध्ये याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. तसेच आंदोलन करून कांद्याचे लिलावही बंद पाडले.

दरम्यान, केंद्राच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्याशी संपर्क साधून याबाबत केंद्राला अवगत करण्याची विनंती केली. त्यातच आज सकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची शरद पवार यांनी भेट घेतली आणि त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली. राज्यात कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे, असे सांगितले. त्यातच केंद्राने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारत निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे, अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. अशा परिस्थितीचा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यातदार देश अनाठायी फायदा घेऊ शकतात, असे शरद पवार यांनी पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले.

राज्य सरकारही नाराज,केंद्राला पत्र पाठविणार
केंद्र सरकारने कांदा उत्पादनावर निर्यातबंदी घातल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला असून, या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारे पत्र केंद्राला पाठविणार असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे हजारो टन कांदा बंदरांमध्ये अडकला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे मनमाड, लासलगावात आंदोलन करण्यात आले. या निर्णयामुळे कांद्याच्या भावात क्विंटल मागे १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही या निर्णयाच्या विरोधात छुप्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गोयल यांचे फेरविचाराचे आश्वासन
ळगोयल यांनी हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतीच्या आधारावर घेण्यात आला आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू, असे गोयल यांनी स्पष्ट केल्याचे शरद पवार यांनी सांगितले

बिहार, प. बंगालच्या निवडणुकीवर डोळा
आगामी काळात बिहार, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने शेतक-यांना अडचणीत आणणारा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीच्या राजकारणाची किंमत शेतक-याने का मोजावी? असा सवालही उपस्थित होत आहे.

शेकडो कंटेनर कांदा जागेवरच थांबणार
ळसध्या ४०० कंटेनर मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर तर ८० कंटेनर चेन्नई पोर्टवर आहे. उभ्या एका कंटेनरमध्ये २९ क्विंटल कांदा असतो. ३०० ट्रक कांदा घेऊन निघालेले ट्रक हे बांग्लादेशच्या सीमेवर उभे आहेत. केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे हा कांदा जागेवरच सडण्याचा धोका आहे.

निर्यातबंदीचा पाकला फायदा
भारतातून बांगला देश, मलेशिया, दुबई, इंडोनेशिया यासह इतर देशात कांदा निर्यात केला जातो. त्यामुळे भारताने जर कांदा निर्यात बंदी केली तर निर्यात बंदीचा पाकिस्तानला फायदा होण्याची शक्यता आहे.

लोकसहभागातुन भाटशिरपुरा शाळेची झाली प्रगती : मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

उत्तरप्रदेश सरकारने केली देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी बनवण्याची घोषणा

लखनऊ : देशभरात सर्वात मोठा हिंदी फिल्मोद्योग म्हणून मुंबईचं नाव प्रसिद्ध आहे. परंतु आता उत्तरप्रदेश सरकारने देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्म सिटी बनवण्याची घोषणा...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...