27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रइनोव्हा कार दरीत कोसळली ; २ ठार, दोघे जखमी

इनोव्हा कार दरीत कोसळली ; २ ठार, दोघे जखमी

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : पुईखडी येथे कार २५ फूट खोल दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोल्हापुरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची माहिती आहे. शुभम हेमंत सोनार (वय २४, रा. राजारामपुरी) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय २८, रा. मोरेवाडी, ता. करवीर) अशी ठार झालेल्या दोघांची नावे असून संकेत बाळकृष्ण कडणे (२१, रा. खाडीलकर गल्ली, गावभाव, सांगली), सौरभ रवींद्र कणसे (२६, रा. राजारामपुरी ६ वी गल्ली) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सोनार, शंतनू कुलकर्णी, संकेत कडणे व सौरभ कणसे हे चौघे आपल्या इनोव्हा गाडीतून वाशी येथे गेले होते. तेथे फार्महाऊसवर जेवण करून मध्यरात्री चौघेही घरी जात होते. त्यावेळी शुभम हा कार चालवत होता. भरधाव कार ही पुईखडी टेकडीवर आल्यानंतर त्यावरील शुभमचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावरून खाली जाऊन सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळून उलटली.

या दुर्घटनेत शुभम सुतार व शंतनू कुलकर्णी हे दोघे जागीच ठार झाले. तसेच संकेत कडणे व सौरभ कडणे हे दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घरातील तरुण मुले गमावल्याने सुतार आणि कुलकर्णी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच दोन्ही कुटुंबांनी मोठा आक्रोश केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या