25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeमहाराष्ट्रजलयुक्त ची चौकशी हा सरकारचा प्रश्न - पंकजा मुंडें

जलयुक्त ची चौकशी हा सरकारचा प्रश्न – पंकजा मुंडें

एकमत ऑनलाईन

परळी : राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाजपा नेत्यांकडून टीका केली जात आहे. जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभाराबाबत कॅग ने ताशेरे ओढल्यानंतर चौकशीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना चौकशी लावावी की नाही हा सरकारचा प्रश्न आहे असे म्हटले आहे.

पंकजा मुंढे पुढे म्हणाल्या की, योजनेचा उद्धेश अत्यंत चांगला आणि लोकहिताचा आहे. बीडमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा याचा किती फायदा झाला हे लोकांना माहिती आहे. ही लोकांची योजना आहे

सुडबुद्धीने चौकशी नाही : अजित पवार
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. हे सुडबुद्धीने करत नाही. कॅगचा अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत ,असे सांगितले. सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण करणार आहे? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचे सरकार होते तेव्हा जलसंधारण खाते ज्यांच्याकडे होते त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते. त्यांनीच तसे सूतोवाच केले होते असेही अजित पवार यांनी सांगितले.

दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश – लष्कर ए तोयबा चा अड्डा उद्ध्वस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या