22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रभावी मंत्र्यांचा थाटात शपथविधी करण्याचा हट्ट!

भावी मंत्र्यांचा थाटात शपथविधी करण्याचा हट्ट!

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या २० किंवा २१ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा शपथ होण्याची शक्यता आहे. पण, काही मंत्र्यांना थाटामाटात शपथ घ्यायची आहे. तर पूरपरिस्थिती असल्यामुळे साध्याच पद्धतीने शपथविधी घ्यावा, अशी चर्चाही भावी मंत्र्यांमध्ये रंगली आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकार येऊन १५ दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अखेरीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २० किंवा २१ तारखेला मुंबईत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण १२ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र, शपथविधी सोहळ्यावरून आमदार- मंत्र्यांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही भावी मंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीमुळे साधेपणाने राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी करण्याची मागणी केली आहे. तर काही भावी मंत्र्यांनी विधान भवनातील प्रांगणात मोठ्या दिमाखात शपथविधी करण्याची मागणी केली आहे.

अशा दोन्ही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात आल्या आहेत. मात्र, राज्यात एकीकडे पूरपरिस्थिती असल्यामुळे शपथविधी थाटामाटात करणे योग्य आहे का? असा प्रश्नही विचारला जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या