37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रविम्याचे कवच राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? : राज ठाकरे

विम्याचे कवच राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? : राज ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी या पत्रातून खासगी डॉक्टरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. ‘खासगी सेवेतील डॉक्टरांना विमाकवच नाकारणे असंवेदनशील आहे. खासगी सेवेतील डाँक्टरांना मृत्यूनंतरही कुटुंबाला ५० लाखाचा विमा मिळायला हवा’, असे राज ठाकरे म्हणाले.

मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटायला आले होते. त्यांनी त्यांचे या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितलले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली, त्याने माझे मन विषण्ण झाले. मुळात जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे, तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे?, याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा; ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या