23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रठाकरेंप्रमाणे शिंदेंचीही मुलाखत घ्या

ठाकरेंप्रमाणे शिंदेंचीही मुलाखत घ्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. ज्याप्रमाणे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंचीदेखील मुलाखत घ्यावी, असे मत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केले आहे.

राऊतांनी शिंदेंचे म्हणणेही ऐकून घ्यायला हवे असेही त्या म्हणाल्या. याशिवाय ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करणार असल्याचे सय्यद यांनी म्हटले आहे. याआधीदेखील सय्यद यांनी आपण दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे सय्यद यांनी म्हटले होते.

सय्यद म्हणाल्या की, ज्या पद्धतीने राऊत यांनी मुलाखत घेत उद्धव ठाकरेंच्या मनातील भावना जगासमोर आणल्या त्याप्रमाणे शिंदे यांचीदेखील मुलाखत घ्यावी. यामुळे कुठेतरी एकत्र येत एखादी चांगली गोष्ट बाहेर येण्यास मदत होईल. यामुळे एक चांगला मध्यस्थीचा मार्ग निघण्यासदेखील मदत होईल. दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आपण दिल्लीमध्ये भाजप आणि सेनेच्या नेत्यांसह राऊतांची भेट घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

ज्या पद्धतीने तुम्ही एकत्र कुटुंबात होता, आहात कारण अद्यापपर्यंत तुम्ही वेगळे झालेले नाही. न्यायालयाचा निकाल लागलेला नाही. मग या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न का करत नाही, असा सवालदेखील सय्यद यांनी उपस्थित केला असून उद्धव ठाकरेंची मुलाखत ज्या पद्धतीने ‘सामना’मध्ये प्रकाशित झाली त्याप्रमाणे राऊतांनी शिंदे यांची मुलाखत घेऊन त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे सय्यद म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या