31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रगोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करा

गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करा

एकमत ऑनलाईन

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन अर्णव गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बºयाच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीची अर्ज फेटाळला. ना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून, सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावे लागेल.

अर्णब प्रकरणात राज्यपालांची उडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या