23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रवेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प का बाहेर गेला याची चौकशी कराच !

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प का बाहेर गेला याची चौकशी कराच !

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही तरी वेगळ्या मागण्या केल्याने वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला, असा आरोप काही जण करत आहेत. असे काहीही झालेले नाही. तरीही कोणाला तशी शंका वाटत असेल तर केंद्रात व राज्यात तुमचेच सरकार आहे. सर्व तपास यंत्रणा तुमच्या हातात आहेत. कराच चौकशी, दूध का दूध पानी का पानी होउनच जाऊ द्या , असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाला दिले. ग्रामपंचायत निवडणुकांत महाविकास आघाडीलाच जास्त जागा मिळाल्याचा दावा त्यांनी केला. शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांनाच मिळावी असेही ते म्हणाले.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत असा प्रयत्न सुरू होता. मात्र वेगळया मागण्याकिंवा डिमांड केली होती म्हणून प्रकल्प गेला असे आरोप काही लोक करत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना असं अजिबात झालेले नाही. कारण नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जर कुणाला वाटत असेल तर केंद्रसरकार, राज्यसरकार, एजन्सी तुमच्या हातात आहेत. खुशाल चौकशी करावी. पण बेफाम आरोप करुन बेरोजगारांमध्ये गैरसमज निर्माण करु नये असे अजित पवार म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अमुक पक्षाला अमुक जागा मिळाल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसतात. महाविकास आघाडीलाच जास्त जागा मिळाल्या आहेत. ही पुढच्या निवडणुकांची रंगीत तालीम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दसरा मेळाव्यासाठी अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. वास्तविक शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्कमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झाला आणि त्यानंतर बाळासाहेबांनी ती जबाबदारी दसरा मेळाव्यातच उध्दव ठाकरे यांच्यावर पक्षप्रमुख म्हणून सोपवली होती. शिवसेनेचं नेतृत्व उध्दव ठाकरे हे करतील असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. आता बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाला मेळावा घ्यायला परवानगी मिळाली आहे तर शिवाजी पार्कवर उध्दव ठाकरे यांना परवानगी द्यायला हवी. दोन्ही मेळावे व्हावेत आणि दोघांचे विचार राज्याने ऐकावे असेही अजित पवार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या