22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रमनसेच्या मेळाव्याचे वसंत मोरेंना निमंत्रण

मनसेच्या मेळाव्याचे वसंत मोरेंना निमंत्रण

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेतील अंतर्गत धुसफूस आता काही कोणापासून लपलेली नाही. पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना इतर पदाधिकारी साईडलाईन करू पाहतायत, असे स्पष्ट चित्र पुण्यात आहे. खुद्द वसंत मोरेंनीही ते अनेकदा बोलून दाखवले. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेच्या आयोजनातही वसंत मोरे कुठेही दिसले नव्हते.

त्यानंतर राज ठाकरे आज मुंबईत मनसेच्या पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीचे निमंत्रण वसंत मोरेंनाही पाठवण्यात आले आहे. मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मेळाव्याला वसंत मोरे येणार का? आणि आले तर ते राज ठाकरेंपुढे त्यांच्या तक्रारी मांडणार का?, हा प्रश्न आहे.

पुणे मनसेत अंतर्गत वाद
ब-याच दिवसांपासून वसंत मोरे आणि पुणे मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. मनसेतील एका गटाकडून वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरे आल्याशिवाय मनसेच्या पुणे शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी पुण्यातील सभेपूर्वी राज ठाकरेंशी चर्चा करणार असे सांगितले होते. मात्र, काही कारणास्तव ही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आजच्या पदाधिकारी मेळाव्यात वसंत मोरे त्यांची भूमिका राज ठाकरेंपुढे मांडण्याची शक्यता आहे.
\\\

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या