21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रइक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबई एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीने ही कारवाई केली. गेल्या वर्षभरापासून मुंबईतील ड्रग्ज रॅकेट आणि त्यामागे असणा-या अनेक मोठ्या नावांची चौकशी एनसीबीकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आज एनसीबीने इकबाल कासकरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर एनसीबीने इक्बालला अटक केली. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कस्टडीची मागणी एनसीबी अधिकारी करतील, असे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत. याच कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिका-यांच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचे एनसीबीच्या लक्षात आले. त्यानंतर आता एनसीबीने ही कारवाई केली.

मुंबईत कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त
मुंबईत गेल्या २ दिवसांत एनसीबी अधिका-यांनी मुंबईत मोठी कारवाई केली. या कारवाईत एनसीबीच्या अधिका-यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यवधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे.

जेईई मेन परीक्षा १७ जुलैला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या