17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeबीडबेकायदेशीर धर्मांतरावरून बीडचा इरफान शेख अटकेत

बेकायदेशीर धर्मांतरावरून बीडचा इरफान शेख अटकेत

एकमत ऑनलाईन

बीड : उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख हा मूळचा सिरसाळा (ता. परळी, जि. बीड) येथील रहिवासी असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे थेट बीडपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. या वृत्ताने शेख यांच्या नातेवाईकांनाही धक्का बसला. सिरसाळा येथेच त्याचे बालपण गेले असून वडिलांचे निधन झाले आहे, तर अन्य तीन भावांपैकी दोघे गावात व एक परळीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

सिरसाळा (ता. परळी) येथील इरफान खाजा शेख याला उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी दिल्लीत ताब्यात घेतल्याचे मंगळवारी समोर आले. दिल्लीतील मिनिस्टरी ऑफ चाईल्ड वेलफेअरमध्ये इंटर प्रिपेटर म्हणून शेख काम करत होता. तो दिल्लीतच वास्तव्यास असल्याने गावाशी त्याचा फारसा संपर्क नाही. मात्र, त्याच्या अटकेने नातेवाईकांना धक्का बसला आहे. पाच ते सहा वर्षांपासून इरफान शेख दिल्लीला असल्याचे सांगितले जाते. तो मुकबधिर नागरिकांसाठी काम करत आहे एवढेच माहित होते असे ग्रामस्थांनी सांगितले. इरफान शेख हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. सासरवाडी परळीतीलच असून सासरे एका शाळेवर शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या सिरसाळा येथील त्याच्या घराला कुलूप असून आई व भाऊ परिवारासह बाहेरगावी गेल्याचे शेजा-यांकडून सांगण्यात आले. दहशतवादी कारवाई प्रकरणासह पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटातही बीडचे नाव समोर आले होते, तर काही दिवसापूर्वी टुल किट प्रकरणातही बीडच्या एका मुलाला अटक करण्यात आली होती. आता बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातही बीडचा संबंध आल्याने देशपातळीवर चर्चा होत आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित विद्यालयातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मिनिस्टरी ऑफ चाईल्ड वेलफेअरमध्ये इंटर प्रिपेटर म्हणून काम करणा-या इरफान खाजा शेख याचे कौतुक केले होते. शिवाय त्याला उत्कृष्ट दुभाषकाबद्दल सन्मानितदेखील केले गेले होते, अशीदेखील माहिती समोर आली आहे. मात्र आता बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात इरफानचे नाव समोर आल्याने त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला, असून इरफान असे कृत्य करू शकत नाही, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

संतोष बालगीर याचे सायकलवर भारतभ्रमण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या