24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रलस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागले लोखंड अन् स्टील !

लस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागले लोखंड अन् स्टील !

एकमत ऑनलाईन

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे परिणाम-दुष्परिणाम याविषयी अनेक चर्चा असतानाच नाशिक शहरातील सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत.

अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्निक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर बघितले. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई-वडिलांची चाचणी घेतली. तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचे लक्षात आले.

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी यांनी देखील याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी तेथे भेट दिली. त्यांनी हा चमत्कार नसून विज्ञानाचाच एक भाग असून संबंधित ज्येष्ठ नागरिकाची वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असे सांगितले.

‘चुंबक मॅन’च्या तपासणीसाठी आरोग्य पथक दाखल
नाशिकमधील या व्यक्तीच्या घरी नुकतेच आरोग्य पथक पोहोचले आहे. हा सगळा प्रकार पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि आरोग्य विभागही दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. लस घेतल्यावर चुंबकीय ऊर्जा निर्माण झाली असेल तर तो दावा ग्राह्य धरू शकत नाही, असे नाशिकचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी म्हटले आहे. पण वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य चक्रावले
कोव्हिशील्ड लस घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीरात चुंबकत्व निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तातडीने पाहणी केली. याबाबत कुठलीही अंधश्रद्धा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुठलेही गैरसमज न ठेवता यामागील वैज्ञानिक कारण शोधावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत गैरसमज न ठेवता यामागचे नक्की वैज्ञानिक कारण काय असेल ते शोधले पाहिजे, असे म्हटले आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेत अरुणा तंवरने रचला इतिहास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या