23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रअख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणे गरजेचे आहे का?- राज ठाकरे

अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणे गरजेचे आहे का?- राज ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील परिस्थिती करोनामुळे अत्यंत कठीण बनत चालली आहे. पंरतु, राज्य सरकारकडून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.मात्र यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. याच सर्व लॉकडाऊन आणि अनलॉकच्या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय चुकला का?, या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘मी काही यातला तज्ज्ञ नाही आणि डब्ल्यूएचओही माझ्याकडून काही सल्ले घेत नाही. परंतु, मी सुरूवातीला डॉक्टरांशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं होतं की, सुरूवातीच्या काळातच कडक लॉकडाउन पाळणं गरजेचं होतं. ते पाळलं गेलं नाही. आता ही गोष्ट आपल्या हाताबाहेर गेली आहे. मी मंत्रालयात बैठकीला गेल्यानंतर म्हणालो होतो की, आपल्याला या विषाणूंसोबत जगायला शिकावं लागेल,’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, ‘या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणे गरजेचे आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,’ असं सवाल राज ठाकरे म्हणाले.

Read More  इरफान खानचा मुलगा म्हणाला…मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या