26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रविमानतळाला शिवरायांचे नाव देणे उचित - मनसे प्रमुख राज ठाकरे

विमानतळाला शिवरायांचे नाव देणे उचित – मनसे प्रमुख राज ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवी मुंबई विमानतळ हे नव्याने बांधले जात जरी असले तरी तो मुंबई विमानतळाचाच एक भाग आहे. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच शिवाजी महाराजांचे नाव दिले असते असे परखड भाष्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, नवीन होत असलेल्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी आहे. सरकारकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह आहे. मी त्यांच्यापुढे वस्तुस्थिती ठेवली. नवीन विमानतळे ही शहराच्या बाहेर होत असतात. जरी ते विमानतळ नवी मुंबईत होत असले तरी ते मुंबईचे विमानतळ असणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत जागा नसल्यामुळे नवी मुंबईमध्ये विमानतळ होत आहे. त्यामुळे त्या विमानतळाला शिवाजी महाराज यांचे नाव असेल असे मला वाटते. हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीसुद्धा या विमानतळाला शिवाजी महाराज यांचेच नाव सुचवले असते, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आता जसे छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे तेच नाव तिकडे असणार आहे. मुंबईतील विमानतळ हे डोमेस्टिक असेल आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे नाव देणे उचित असेल, ते विमानतळ या विमानतळाचा भाग आहे. त्याचा कोड इडट ह च असणार आहे, असेही राज ठाकरे यांनी समजून सांगितले.

‘समांतर-२’ चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या