23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रसरकारी कार्यालयात वंदे मातरम म्हणणे बंधनकारक

सरकारी कार्यालयात वंदे मातरम म्हणणे बंधनकारक

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असून आज खातेवाटप झालं आहे. या खातेवाटपात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा भार सोपविण्यात आला आहे. मुनगंटीवार यांनी खातेवाटप जाहीर होताच मोठा निर्णय घेतला असून यापुढे सरकारी कार्यालयात हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी वंदे मातरम म्हणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या