19.6 C
Latur
Monday, January 25, 2021
Home महाराष्ट्र 2 महिने एफ आय आर न घेणे दुर्देवी आहे -किरीट सोमैय्या

2 महिने एफ आय आर न घेणे दुर्देवी आहे -किरीट सोमैय्या

एकमत ऑनलाईन

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होते. यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च सुनावणी झाली. त्यानुसार, या घटनेचा तपास सीबीआयने करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनाही न्यायालयानं केल्या. न्यायालयाच्या सर्वोच्च निकालानंतर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच, भाजपाच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले होते. मात्र, गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांना टार्गेट केलं आहे.

माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेन्शन करत सोमैय्या यांनी ही मागणी केली आहे.दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं.

आग्रामध्ये 35 प्रवाश्यांनी भरलेली बस हायजॅक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या