मुंबई : लस कधी येणार ते माहिती नाही, पण राज्य सरकारकडून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.
ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी लसीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचे योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणे, त्याची साठवण क्षमता यावर सरकारची तयारी सुरु आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचे वर्गिकरण कसे व्हावे याचे संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे़
लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी