19.2 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeमहाराष्ट्रतर पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही

तर पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही

एकमत ऑनलाईन

पुणे : मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते. नवं काही असा त्यांच्या व्याख्यानमालेचा विषय होता. पुण्याचं वाढते स्वरुप आणि बदलत असलेली जीवनशैली यासंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी पुण्याबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, १९९५ च्या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं पुणं आणि नदी अलीकडचं पुणं असे पुण्याचे केवळ दोन भाग होते. मात्र आता पुणं वाढत आहे. अनेक गाव पुण्यात समाविष्ठ झाले आहेत. त्यामुळे पुण्याचं रुपडं पालटले. आता पुणे हिंजवडी, महाळुंगेपासून मगरपट्टापर्यंत पुणं पसरलं आहे. त्यामुळे मी मागील अनेक भाषणांमध्ये सांगत असतो कि मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं ते म्हणाले.

भाषण आणि व्याख्यानमालेतील फरक
आजपर्यंत अनेकदा मोठ्याा ठिकाणी भाषणे केली. सभा घेतल्या मात्र व्याख्यानमालेत आणि भाषणात फरक काय असतो ते सांगतो. व्याख्यानात जरा शांत भाषेत बोलावे लागते तर भाषणात टीका करावी लागते. आज व्याख्यान करणार आहे. त्यामुळे व्याख्यानात जसे बोलले जाते त्याप्रमाणे मी बोलणार आहे असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या