16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्ररायगड जिल्ह्यात डिटोनेटर्स सदृश वस्तू आढळली

रायगड जिल्ह्यात डिटोनेटर्स सदृश वस्तू आढळली

एकमत ऑनलाईन

रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने गेल्या महिन्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा रायगडमध्ये संशयस्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-गोवा हायवेवरील पेणनजीक स्फोटकसदृश संशयास्पद वस्तू आढळली आहे. यामुळे खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे.

पेणजवळील भोगावती पुलाच्या खालील बाजूला संशयास्पद वस्तू आढळली. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याशिवा रायगड पोलिस अधीक्षक, खालापूर, रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुंबई आणि रायगड येथील बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले.

मुंबई गोवा हायवेवरील पेणनजीक स्फोटकसदृश वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली. पेणजवळ भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीनसदृश कांड्या सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास एकच खळबळ उडाली. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पेणजवळ भोगावती नदीपात्रात गेलेल्या व्यक्तीला पाण्यात संशयास्पद वस्तू दिसून आली. त्या व्यक्तीने तात्काळ काही लोकांना सांगितले. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती पेण पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकाराने खळबळ उडाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या