23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रट्रेनच्या धडकेत जळगावातील महिलेचा मृत्यू

ट्रेनच्या धडकेत जळगावातील महिलेचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना रेल्वे रुळ ओलांडताना एका तरुणीसोबत घडली आहे.रेल्वे रुळ ओलांडणे एक तरुणीला भलतेच महागात पडले आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एक विवाहित तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही तरुणी आपले काम आटपून शिवाजी नगरातील आपल्या घरी जात होती. मात्र, याचवेळी ती आपल्या पतीसोबत बोलत होती. तसेच मोबाईलवर बोलताना तिने इअरफोन घातले होते. याचदरम्यान, रेल्वेरुळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला.

स्रेहल वैभव सोनार (वय १९, रा. धनाजी काळे नगर, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. स्रेहल यांचे दोन वर्षांपूर्वी नाशिक येथील वैभव सोनार यांच्यासोबत लग्न झाले होते. तर शिक्षण अपूर्ण राहिल्याच्या कारणामुळे त्या दिवाळीपासून माहेरी आल्या होत्या. त्या आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जळगाव शहरातील बळीराम पेठ येथे एका दुकानात कामाला होत्या. नेहमीप्रमाणे सोमवारी देखील काम संपल्याने त्या घरी जायला निघाल्या होत्या.

शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने तो बंद होता. त्यामुळे त्या बळीरामपेठजवळील रेल्वेरुळाकडून गेल्या. याचवेळी त्यांनी कानात इयरफोन घातले होते. तसेच त्या त्यांच्यापतीसोबत फोनवर बोलत होत्या. याचदरम्यान सुरत-भुसावळ एक्सप्रेस जळगाव स्थानकाहुन निघून भुसावळकडे निघाली होती. लोको पायलट अशफाक अन्सारी यांना रुळालगत कोणीतरी चालत असल्याचे दिसून आले.

त्यांनी दोन-तीन वेळा हॉर्न दिला. मात्र, स्रेहल यांच्या कानात इयरफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचे हॉर्न ऐकू आले नाही. त्यामुळे शेवटी त्यांना रेल्वेचा जोरदार धक्का लागला. डोक्याच्या मागच्या बाजूस फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अन्सारी यांनी वॉकीटॉकीवरुन घटनेची माहिती स्टेशन मास्तर यांना दिली. दुस-या दिवशी मंगळवारी त्यांचा मृतदेह हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या