कोल्हापूर : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. विधानसभेतील निलंबनानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांना हा दुसरा धक्का मानला जात आहे.
कारण त्यांचे या बँकेवर वर्चस्व आहे. दरम्यान, विरोधात असताना केलेली चौकशीची मागणी विद्यमान अध्यक्ष मानसिंग नाईक यांच्या अंगलट आली आहे. जिल्हा बँकेवर जयंत पाटील यांची अनेक वर्षांपासून सत्ता आहे.