22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home महाराष्ट्र जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. महाविकास आघाडीचे सरकारच्या कारभारामुळे आपल्‍याला पुन्हा सत्‍ता मिळणार नाही याची जाणीव झाल्याने काही लोकांचे नैराश्य वाढले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्‍यांवरील कारवाईतून भाजपाची ही अस्‍वस्‍थता समोर येत आहे. अशी टीका पवार यांनी यावेळी केली. सत्‍ता परत येण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्‍तव्यावर माणसाने केवळ आशा बाळगण्यास काहीच हरकत नसते असा टोलाही पवार यांनी लगावला.

माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देत राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.शरद पवार यांनी त्‍यांना पक्षात अधिकृत प्रवेश दिला.उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,मंत्री अनिल देशमुख,धनंजय मुंडे,नवाब मलिक आदी नेते यावेळी उपस्‍थित होते.त्‍यावेळी शरद पवार यांनी भाजपावर दमनशाही राजकारणावर जोरदार टीकास्‍त्र सोडले.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीकारवाईबाबत विचारले असता ते म्‍हणाले,महाराष्‍ट्रात आता वर्षभरानंतर महाविकास आघाडी सरकार चांगले स्‍थिरावले आहे.कोरोनाचे संकट आले इतरही संकटे आली.पण या संकटांना मात देत समाजातील अगदी शेवटच्या घटकासोबत उभे राहत सरकारने प्रत्‍येक संकटावर मात केली.हे पाहून भाजपाला आता नैराश्य आले आहे.आपले सरकार काही आता येत नाही हे उमगल्‍याने अस्‍वस्‍थतेपोटी ते अशी पावले उचलत आहेत.सरकार परत येण्याच्या रावसाहेब दानवे यांच्या वक्‍तव्यावर ते म्‍हणाले,दानवे इतकी वर्षे लोकप्रतिनिधी आहेत पण ज्‍योतिष सांगण्याचाही त्‍यांचा हा गुण आपल्‍या परिचयाचा नव्हता.

फडणवीस गेल्‍या वेळी मी परत येईन,मी परत येईन असे म्‍हणत होते.कालपरवा पण त्‍यांनी अशाच पदधतीचे काही तरी वक्‍तव्य केले.माणसाला आशा लागून राहिलेली असते.त्‍यांनी आता केवळ आशा बाळगण्यात काहीच हरकत नाही असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.जयसिंगराव गायकवाड हे माणसांत राहणारे लोकप्रतिनिधी आहेत.देशातील ते कदाचित एकमेव खासदार असतील की ते दौ-याच्या वेळी स्‍थानिक जनतेच्या घरीच मुक्‍काम करायचे. मतदारसंघातील गावा-गावात त्‍यांचा संपर्क आहे.दिवस-रात्र ते माणसांची सुख-दुःख समजून घेणयाचेच काम करत राहिले.त्‍यांच्या येण्याने पक्षाला निश्चितच फायदा होईल असेही शरद पवार म्‍हणाले.

साहेब मी आलोय आता मागे येणा-यांची मोठी लाईन आहे
जयसिंगराव गायकवाड यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलयानंतर आपल्‍या भावना व्यक्‍त केल्‍या.ते म्‍हणाले,१२ वर्षे राष्‍ट्रवादीला सोडल्‍याचा आपल्‍याला पश्चाताप झाला.त्‍याचे पापक्षालन करण्यासाठीच पुन्हा तुमच्यासोबत आलोय.आता मी आलोय.आपल्‍यामागे राष्‍ट्रवादीत येणा-यांची मोठी लाईन आहे.भाजपामध्ये चांगल्‍या कार्यकर्त्याला मान-सन्मान नाही. एखादया खतरनाक दहशतवादयाने पक्षाचा ताबा घेतल्‍यासारखी तिथे अवस्‍था आहे. जिथे आपला कोंडमारा होतो अशा पक्षात राहायचे नाही हा निर्णय घेतला.एखादया गोडाउनमधून बाहेर आल्‍यानंतर आपण जसा मोकळा श्वास घेतो तसे आता आपल्‍याला वाटते आहे.मी पदवीधरमध्ये उभा होतो तेव्हा ३४ उमेदवार होते.त्‍यातील ३३ जणांचे डिपॉझिट जप्त करून २० हजारांच्या विक्रमी मताधिक्‍याने आपण निवडून आलो होतो.आतापर्यंत हा रेकॉर्ड आहे.आता सतिश चव्हाणांना ४० हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आणून हा रेकॉर्ड आपणच मोडू असेही गायकवाड म्‍हणाले.जयसिंग काकांच्या प्रवेशामुळे पक्ष मराठवाडयात मजबूत होणार आहे.वडिलकीच्या नात्‍याने त्‍यांनी आपली नेहमीच साथ दिली आहे.राष्‍ट्रवादी ज्‍या प्रकारे पश्चिम महाराष्‍ट्रात मजबूत आहे त्‍या प्रमाणेच मराठवाडयातही मजबूत करू.भाजपाला मराठवाडयातून पूर्णपणे संपवून टाकू असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्‍त केला.

जमीन घोटाळयात फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींची नावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या